नांदेड -प्रत्यक्ष कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात राहून त्यांच्यावर उपचार करत कोरोनामुक्तीसाठी आरोग्य कर्मचारी अहोरात्र लढत आहेत. याच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत त्यांचे कौतुक करण्यासाठी नांदेडमध्ये शहर वाहतूक पोलीस शाखेने अनोखा उपक्रम राबवला आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना गुलाबपुष्प चिटकवत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नांदेडमध्ये कोरोना योद्ध्यांच्या वाहनांना 'गुलाबपुष्प' चिटकवून वाहतूक पोलिसांनी मानले आभार - आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वाहनांना गुलाबपुष्प
प्रचंड जोखीम उचलत कोरोना विरोधात आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र आरोग्य सेवा देत आहेत. नांदेडात याच पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून कोरोना योद्ध्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना 'गुलाबपुष्प' चिटकवून केले स्वागत
हेही वाचा...'त्या' मातेने पाहिली व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपल्या बाळाची पहिली झलक
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत हा उपक्रम राबवला आहे. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स आणि इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात आम्हीही तुमच्या सोबत आहोत, असा संदेश वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी यातून दिला आहे.