महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 21, 2019, 5:47 PM IST

ETV Bharat / state

नांदेड-हैदराबाद महामार्गावरील टोलनाक्यावर दरोडा; गूढ अद्यापही कायम

कहाळा टोल नाक्यावर १९ जुलैच्या रात्री एक चारचाकी गाडी आली. त्यातून आलेल्या तरुणांनी बुथमधील २-३ संगणक फोडले आणि लुटमार केली.

कहाळा टोल नाका

नांदेड - हैदराबाद मार्गावर कहाळा टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दरोडा पडला. यात ५० हजार रुपये चोरट्यांनी नेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामागचे गुढ अजून कायम आहे. याबाबत कुंटूर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कहाळा टोल नाक्यावर १९ जुलैच्या रात्री एक चारचाकी गाडी आली. त्यातून आलेल्या तरुणांनी बुथमधील २-३ संगणक फोडले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळक्याला पैसे चोरण्यापेक्षा तोडफोडीत जास्त रस होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर कुंटूर पोलिसांनी नांदेड शहर, नायगाव रस्ता, देगलूर रस्ता आणि गडगा रस्ता या ठिकाणी नाकाबंदी करुनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

कहाळा टोल नाका

कुलबीर सिंह हा शुक्रवारी दुपारी त्याचा ट्रेलर घेऊन या टोलनाक्यावरून जात होता. यावेळी त्याची आणि टोल कर्मचाऱ्यांची बाचाबाची झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले, ज्यात कुलबीरसिंगच्या डोक्याला मार लागला. ज्या दिवशी त्याला मारहाण झाली त्याच रात्री ही दरोड्याची घटना घडली. यावरून त्याला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा दरोडा टाकला असावा आणि तोडफोड केली असावी, असा अंदाज टोल कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

कुलबीरसिंगला झालेली मारहाण आणि टोलनाक्यावरील तोडफोड या दोन्ही प्रकरणाचा गुन्हा नोंद झाला किंवा नाही याविषयी कुंटूर पोलिसांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक शरद मरे यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details