नांदेड- शहरातील एका पत्रकाराच्या घरी भरदिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी तब्बल ८ तोळ्याचे सोन्याचे दागिणे आणि पाच हजार रुपये रोकड असा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीची घटना शहरातील सरपंचनगर येथील दत्तविला अपार्टमेंटमधील नरेश दंडवते यांच्या घरात घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये पत्रकाराच्या घरी भरदिवसा चोरी; ८ तोळे लंपास - घरफोडी
सकाळी ११ वाजताच्या सुमारास चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण केले आहे. या अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकाला चकवा देऊन चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरी केली
पत्रकार नरेश दंडवते हे २ मे'च्या दिवशी आपल्या कुटुंबीयांसह शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून कपाटाचे लॉक तोडून चोरी केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी त्यांच्या शेजारी सर्व घरांचे दरवाजे बाहेरून लावून घेतले होते.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण केले आहे. या अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकाला चकवा देऊन चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरी केली. या प्रकरणी नरेश दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस त्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.