नांदेड- कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून माहूर येथील रेणुकादेवी, दत्तशिखर, देवदेवेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, सर्व धार्मिक संस्थानाचे प्रमुख व पत्रकारांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
कोरोनासंदर्भात आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी माहूर तालुक्यात बैठक घेतली. बैठकीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वाघमारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव भिसे यांनी यावेळी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाची माहिती दिली. तर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी नगरपंचायत प्रशासन, पंचायत समिती, धार्मिक संस्थाने यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना स्थगिती दिली. गर्दी जमा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तालुका प्रशासनाने तालुकास्तरीय पथकाची स्थापना करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या नगर पालिका, पंचायत समिती, आरोग्य विभागाचे प्रत्येकी एक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.