नांदेड - सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी माहूरच्या रेणुकादेवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कुटुंबीयांसह गडाच्या पायथ्याशी बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून हे कर्मचारी संस्थानसाठी काम करीत आहेत.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरणी NIA ची टीम परतली रिकाम्या हातांनी.. कागदपत्रे देण्यास पुणे पोलिसांचा नकार
सिटू कामगार संघटनेअंतर्गत येणारी मजूर संघटनाही या सत्याग्रहात सहभागी आहे. या आंदोलनकर्त्यांना संस्थानचे कोषाध्यक्ष आणि तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सोमवारी भेट दिली. येत्या १६ फेब्रुवारीला संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपक धोळकीया गडावर येऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवेत कायम केल्याचे पत्र देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मात्र, आम्हाला तत्काळ या आशयाचे लेखी पत्र द्या, अशी ताठर भूमिका घेवून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे.