महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के - नांदेड रिकव्हरी रेट

आजच्या एकुण 1 हजार 45 अहवालापैकी  981 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 174 एवढी झाली असून यातील 17 हजार 979 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 532 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 35 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

Nanded
नांदेड

By

Published : Nov 1, 2020, 8:20 PM IST

नांदेड - आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 55 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 16 बाधित आले. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के आहे.

आजच्या एकुण 1 हजार 45 अहवालापैकी 981 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 174 एवढी झाली असून यातील 17 हजार 979 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 532 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 35 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालानुसार एका बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज विष्णुपुरी नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृतांची संख्या 514 एवढी आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 15, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10 असे 45 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, मुदखेड तालुक्यात 1, कंधार 3, हिंगोली 1, भोकर 3, लोहा 1, धर्माबाद 2, परभणी 1 असे एकुण 39 बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 6, किनवट तालुक्यात 3, देगलूर 1, कंधार 1, हिमायतनगर 1, माहूर 1, बिलोली 3 असे एकूण 16 बाधित आढळले.

सद्यस्थितीत रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 91, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 69 एवढी आहे.

जिल्ह्यातील कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 14 हजार 752
निगेटिव्ह स्वॅब- 92 हजार 116
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 174
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 979
एकूण मृत्यू संख्या- 514
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 3
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 454
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 532
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 35

ABOUT THE AUTHOR

...view details