महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओला दुष्काळ जाहीर करा; राजमुद्रा ग्रुपचा तहसील कार्यालयावर मोर्चा

परतीच्या सततच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पंचनामे आणि नुकसानीची पाहणी बंद करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे केली. सचिन पाटील इंगोले यांच्या नेतृत्वात काढलेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

rajmudra group agitation in nanded
ओला दुष्काळ जाहीर करा; राजमुद्रा ग्रुपचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By

Published : Oct 19, 2020, 8:13 PM IST

नांदेड -अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आज (सोमवारी) तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कंधार येथे ओला दुष्काळ घोषित करण्यात यावा या मागणीसाठी आज राजमुद्रा ग्रुपच्यावतीने शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढण्यात आला. नुकसानाचे पंचनामे आणि नुकसान ग्रस्त भागाची पाहणी बंद करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे केली.

राज्यात परतीच्या पावसाने आणि त्याचबरोबर समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करत राजमुद्रा ग्रुपच्यावतीने आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कंधार इथे ओला दुष्काळा जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

परतीच्या सततच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पंचनामे आणि नुकसानीची पाहणी बंद करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी शासनाकडे केली. सचिन पाटील इंगोले यांच्या नेतृत्वात काढलेल्या या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details