महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पिकांचे मोठे नुकसान - नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

शहर व जिल्ह्यात सायंकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पाऊस पडतानाचे छायाचित्र
पाऊस पडतानाचे छायाचित्र

By

Published : Mar 18, 2020, 11:08 PM IST

नांदेड- शहर व जिल्ह्यात सायंकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. तर काही भागात गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेला. पण, पाऊस अजूनही शेतकऱ्याची पाठ सोडत नसून रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस त्यात गारपीट यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेल्या गहू, हरभरा व हळद पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच केळी व पपईलाही वादळी वाऱ्याचा व गारपिटीचा चांगलाच फटका बसला.

हेही वाचा -CORONA : न्यूज वाहिनीचा लोगो वापरून कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध नांदेडमध्ये गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details