नांदेड- जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण नांदेड शहरातील बाजारपेठामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यात पेपर ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरात दुःखाचे सावट पसरले आहे. हल्ल्याचा बदला घेण्याची भावना संपूर्ण देशवासी व्यक्त करत आहेत.
पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड बंद - Kashmir
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण नांदेड शहरातील बाजारपेठामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. नांदेड शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आहे. या बंद दरम्यान शहरातील तरोडा नाकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तरुणांनी निषेध रॅली काढली. या बंदमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनीदेखील सहभाग नोंदवला होता.
यावेळी सोलापूर मुख्य बाजारपेठ, नवा मोंढा, जुना मोंढा, वजीराबाद बाजार, तारासिंग मार्केट, शिवाजीनगर, भावसार चौक, वर्कशॉप चौक, श्रीनगर, व्हीआयपी रोड, भागातील संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवून निषेध पाळण्यात आला.