महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमधला 'शाहिनबाग'; CAA विरोधात मुस्लीम महिलांचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरू - सीएएच्या विरूद्ध आंदोलन नांदेड

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत केवळ पुरुषांनी सहभाग घेतला. परंतु, गुरुवारपासून या आंदोलनात महिलाही सक्रिय झाल्या आहेत. गुरुवारी दुपारी २ ते ५ या वेळेत शहरातील खडकपुरा, गंगाचाळ, पक्कीचाळ येथील महिलांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

protest-against-caa-in-nanded
protest-against-caa-in-nanded

By

Published : Jan 17, 2020, 10:39 PM IST

नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात मुस्लीम महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून घोषणाबाजी केली. गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, शुक्रवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. हे आंदोलन यापुढेही सुरू राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

नांदेडमधला 'शाहिनबाग'

हेही वाचा-'पटानी'च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' उत्तर

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत केवळ पुरुषांनी सहभाग घेतला. परंतु, गुरुवारपासून या आंदोलनात महिलाही सक्रिय झाल्या आहेत. गुरुवारी दुपारी २ ते ५ या वेळेत शहरातील खडकपुरा, गंगाचाळ, पक्कीचाळ येथील महिलांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता दररोज वेगवेगळ्या मर्यादीत भागातून महिला आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. अंध व अपंग नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. कुल जमाती तहरिकच्यावतीने दररोज सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details