अजित पवार यांचा अपमान - प्रवीण दरेकर नांदेड : अजित पवार यांना डावलण्याचे नियोजित षडयंत्र पक्षामध्ये चालले असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या वेळेस भाकरी फिरवणार म्हटले होते, त्याच वेळेस सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा निश्चित झाला होता, परंतु काय झाले माहिती नाही. सुप्रिया सुळे या पडद्यामागून सूत्र हलवत होत्या. परंतु, आता त्यांनी थेट दाखवून दिले की, महाराष्ट्रातील भविष्यातील नेतृत्व सुप्रिया सुळे करतील, ही गोष्ट मान्य करावी लागेल. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांना डावलण्याचे षडयंत्र सुरू आहे. अजित पवार यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील भविष्यातील नेतृत्व सुप्रिया सुळे करतील- भाजप नेते प्रवीण दरेकर
वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात घोषणा : पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. शरद पवार यांनी महाराष्ट्राबरोबरच पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली. या घोषणेनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी न बोलता निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
पक्षातून कट कारस्थानाचा आरोप : नंतर अजित पवार यांनी ट्विटरवरून सुप्रिया सुळे यांना शुभेच्छा दिल्या. यावर मात्र भाजप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. अजित पवार हे अत्यंत संयमी कर्तत्ववान व धाडसी निर्णय घेणारे नेते आहे. त्यांच्या पक्षातून कट कारस्थान रचल्या जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी लावला. अजित पवार यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Ajit Pawar : 'मी नाराज नाही, मला राज्याच्या राजकारणात इंटरेस्ट', अजित पवारांची प्रतिक्रिया
- Sharad Pawar Threat Case: शरद पवारांना धमकी देणाऱ्यास अटक करून मास्टरमाईंड शोधा - अजित पवार
- Ajit Pawar : अजित पवारांनी थेट गाठले पोलीस स्टेशन, वसतीगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी चौकशीची केली मागणी, अपयशी सरकार असल्याची टीका