नांदेड - उमरी तालुक्यातील बोळसा (गंगा पट्टी) या गावात ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर सायंकाळी अचानक गर्दी झाली. जवळपास ३५० मतदार एकाच वेळेला रांगेत आल्याने सर्वांना मतदान करण्यासाठी रात्रीचे ११ वाजले.
नांदेड : एकाचवेळी ३५० मतदारांची रांग लागल्याने बोळसा येथे रात्री ११ वाजेपर्यंत मतदान - eleventh
उमरी तालुक्यात सरासरी ६५% मतदान शांततेत झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी सांगितले.
बोळसा येथे रात्री ११ वाजेपर्यंत मतदान
बोळसा येथे एकच मतदान केंद्र असून सकाळपासूनच मतदान संथ गतीने झाले. रात्री एकाचवेळी ३५० जण आल्या नंतर सर्व मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या. मतदानाची वेळ संपून गेली असतानाही रांगेत असलेल्या मतदान पूर्ण करण्यासाठी रात्री जवळपास अकरा वाजले, असे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बटेवाड यांनी सांगितले.
उमरी तालुक्यात सरासरी ६५% मतदान शांततेत झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी सांगितले.