महाराष्ट्र

maharashtra

माळेगावातील पाणी पुरवठा योजनेवरून राजकीय वाद; माळेगावकरांच्या तोंडचं पाणी पळालं!

By

Published : Jul 8, 2020, 1:59 PM IST

श्री क्षेत्र माळेगाव हे खंडोबाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र, येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेवरून राजकीय वाद पेटला आहे. ही निविदा नियमबाह्य पद्धतीने काढली असून तिला स्थगिती देण्याची मागणी श्यामसुंदर शिंदे यांनी केली आहे.

malgaon nanded latest news  water supply scheme malegaon  माळेगाव पाणीपुरवठा योजना वाद  माळेगाव नांदेड लेटेस्ट न्यूज
माळेगावातील पाणी पुरवठा योजनेवरून राजकीय वाद; माळेगावकरांच्या तोंडचं पाणी पळालं!

लोहा (नांदेड) - श्रीक्षेत्र माळेगाव येथील मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेवरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला आहे. विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या योजनेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या राजकीय वादामुळे माळेगावकारांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.

श्री क्षेत्र माळेगाव हे खंडोबाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र, येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेवरून राजकीय वाद पेटला आहे. ही निविदा नियमबाह्य पद्धतीने काढली असून तिला स्थगिती देण्याची मागणी श्यामसुंदर शिंदे यांनी केली आहे. आमदाराच्या मागणीमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले आहेत.

माळेगावातील पाणी पुरवठा योजनेवरून राजकीय वाद; माळेगावकरांच्या तोंडचं पाणी पळालं!

जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी मात्र आमदार शिंदे यांचे समर्थन केले आहे. माळेगावचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी लिबोटी येथून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीतील राजकीय वादामुळे माळेगावकारांच्या तोंडचे पाणी मात्र पळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details