महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; अडीच लाखांच्या मुद्देमालासह १५ जणांना अटक - gambling

पोलिसांच्या विशेष पथकाने श्रावस्तीनगर भागात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १५ जुगाऱ्यांना अटक केली. १२ जूनला रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत जुगारचालक आणि त्यांच्या २ साथीदारांसह १५ जणांविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (मुंबई जुगार कायदा) १२ अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला

नांदेडात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; अडीच लाखांच्या मुद्देमालासह १५ जणांना अटक

By

Published : Jun 14, 2019, 12:13 PM IST

नांदेड - शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रंदिवस खुलेआम चालणाऱया जुगार अड्ड्याची किर्ती पोलीस अधीक्षकाच्या कानावर गेली. यानंतर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून १५ जुगाऱयांना गजाआड केले आहे. घटनास्थळी ८२ हजाराच्या रोख रकमेसह दुचाकी व मोबाईल असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्थानकात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; अडीच लाखांच्या मुद्देमालासह १५ जणांना अटक

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भीमसंदेश कॉलनी ते नोबल कॉलनीच्या परीसरातील श्रावस्तीनगर पुलाच्या बाजुला लाला यांचे शेत आहे. या शेतातील मोकळ्या जागेवर अनेक दिवसांपासून खुलेआम जुगाराचा डाव सुरू होता. रात्रंदिवस चालणाऱ्या जुगाराची चर्चा बाजारात सुरू झाली होती. काहींनी स्थानिक पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून डोळेझाक करण्यात आल्याचा आरोप होत होता.

या बहुचर्चित जुगार अड्ड्याची माहिती पोलीस अधीक्षकांपर्यंत गेल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव, अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने श्रावस्तीनगर भागात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १५ जुगाऱ्यांना अटक केली. १२ जूनला रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत जुगारचालक आणि त्यांच्या २ साथीदारांसह १५ जणांविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (मुंबई जुगार कायदा) १२ अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून ८२ हजार रुपये रोख, १० मोबाईल, ५ दुचाकी असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details