महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकीस्वारांकडे आढळली अठरा हजारांची दारू, दोघंना अटक - crime

अनधिकृतरित्या 'अवैध' दारू बाळगणाऱ्या दोघांना नांदेड वाहतूक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना आरोपींकडून तब्बल अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुचाकीस्वारांकडे आढळली अठरा हजारांची दारु

By

Published : Jul 12, 2019, 9:46 AM IST

नांदेड- अनधिकृतपणए दारू बाळगणाऱ्या दोघांना नांदेड वाहतूक पोलिसांनी अटक केली आहे. अवैध वाहनांची तपासणी करताना हे तरून दुचाकीवरून अवैधरित्या दारू घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली असून सुमेध नरवाडे ( रा . कामठा ता . कळमनुरी जि . हिंगोली ) आणि संतोष कोरडे रा. कोळी ता. हदगाव ( जि . नांदेड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

दुचाकीस्वारांकडे आढळली अठरा हजारांची दारु

गुरूवारी आयटीआय चौकात वाहन तपासणीदरम्यान एका दुचाकीला पोलिसांनी थांबविले. यावेळी या दुचाकीस्वारांकडे एक पिशवी आढळून आली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात मॅकडॉल कंपनीची दहा हजार आठशे रुपयांची आणि आयपी कंपनीची सहा हजार सातशे वीस रुपयांची दारु असा अठरा हजाराचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून दुचाकी जप्त केली आहे.

सहाय्यक फौजदार दीप भंडारे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ABOUT THE AUTHOR

...view details