नांदेड - खंजीरने हल्ला करून जबरी चोरी केल्याप्रकरणी दोघांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शहरातील जयभीम नगरमधील रहिवासी प्रवीण घुले व त्याचा मेहुणा प्रतिक यांना विष्णूपुरी शिवारात खंजीराचा धाक दाखवून लूटले होते.
नांदेडमध्ये खंजिराने हल्ला करून लूटमार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शहरातील जयभीमनगरमधील रहिवासी प्रवीण घुले व त्याचा मेहुणा प्रतिक या दोघांना आरोपी विकास हाटकर-विष्णुपुरी व अन्य एकाने खंजीरने धाक दाखवला. त्यानंतर प्रवीणवर खंजीरने हल्ला करत त्याच्याकडील ८ हजार रुपये काढून घेतले. तसेच प्रतिक मुनेश्वर याच्याजवळील ३०० रुपयेही या आरोपींनी काढून घेतले व पळ काढला.
प्रवीण घुले व त्याचा मेहुणा प्रतिक हे विष्णूपुरीतील माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाच्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी आरोपी विकास हाटकर-विष्णूपुरी व अन्य एकाने दोघांनाही खंजीरचा धाक दाखवून त्यांना रोखले. त्यानंतर चोरीच्या उद्देशाने प्रवीणवर खंजीरने हल्ला करून त्याच्याकडील ८ हजार रुपये घेतले. तर प्रतिक मुनेश्वर याच्याजवळील ३०० रुपये काढून घेतले व पळ काढला.
या घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत प्रवीणने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुध्द कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जावेद शेख करीत आहेत.