नांदेड- अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणास पाचव्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पित्याने 24 एप्रिल 2019 रोजी तक्रार दिली होती. त्यनुसार 21 एप्रिल रोजी ते आणि त्यांचे सर्व कुटुंबीय जेवण करून झोपले होते. 22 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या पाच मुलींपैकी एक अल्पवयीन मुलगी घरातून गायब होती. यानंतर त्यांनी तीचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर 24 एप्रिल 2019 रोजी त्यांनी पोलीस ठाणे बारड येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलीसांनी शोध घेतल्यनंतर संबंधित अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याचे नाव मोहम्मद वसीम अब्दुल माजीद (वय 20 वर्षे, रा. इस्लामपूरा ) असल्याचे समोर आले आहे. रविवारी दिनांक 12 मेरोजी मोहम्मद वसीमने या मुलीला पळवून नेले होते.