महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - nanded three accused arrested

विनोद कल्याणराव होळकर हे दुचाकीवर आपल्या प्रेयसीला घेऊन हस्सापूर रस्त्याने असर्जनकडे जात असताना त्यांची दुचाकी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या जवळील रक्कम आणि प्रेयसी जवळील दागिने लुटले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत विनोद यांच्या पोटाला जखम झाल्याने त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

nanded
नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तिनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By

Published : Feb 5, 2020, 8:23 AM IST

नांदेड - शहरातील हस्सापूर ते असर्जन रस्त्यावर रात्री प्रेमी युगलाला मारहाण करुन त्यांच्या जवळील ऐवज लुटणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी विष्णुपुरी भागातून अटक केली आहे.ही घटना शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हेही वाचा -अर्धापूर तालुक्यात सालगडी शेतमजुराची आत्महत्या...!

विनोद कल्याणराव होळकर हे दुचाकीवर आपल्या प्रेयसीला घेऊन हस्सापूर रस्त्याने असर्जनकडे जात असताना त्यांची दुचाकी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या जवळील रक्कम आणि प्रेयसी जवळील दागिने लुटले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत विनोद यांच्या पोटाला जखम झाल्याने त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील गुन्हेगारांचा शोध स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग घेत होते.

हेही वाचा -नांदेडमध्ये शॉक लागल्याने वीज कामगाराचा मृत्यू

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ आणि पोलीस कर्मचारी यांना विष्णुपुरी भागात फिरत असताना त्यांना आरोपींची माहिती मिळाली. पोलीस पथकाने मध्यरात्री विकास हटकर, ऋतीक पद्मावार आणि रोहन ससाने या तीन जणांना अटक करण्यासाठी गेले असता आरोपींनी पोलीस पथकावर दगडफेक सुरु केली. या घटनेत पोलीस शिपाई मोतीराम पवार यांच्या हाताच्या दोन बोटांना मार लागला. पोलिसांनी तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तीनही आरोपींना अटक करून पोलिसांनी आरोपींना रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले.

हेही वाचा -चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू, गावकऱ्यांचा रास्ता रोको

आरोपींविरोधात हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कौतुक केले आहे. कौठा ते असर्जन मार्गावर यापूर्वीही अनेक लुटीच्या घटना घडल्या आहेत. अटक केलेले तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी अनेक गुन्हे केले आहेत. मंगळवारी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये एका आरोपीचे वय कमी असल्याने त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details