नांदेड- ट्रकचालकाचा खून करुन तीन वर्षांपासून फरार असलेल्या मारेकऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बोंढार शिवारात ट्रक चालकाला लुबाडून खून करण्यात आला होता. यातील मारेकरी फरार झाले होते.
ट्रक चालक खून प्रकरण; तीन वर्षांपासून फरार असलेल्या मारेकऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तीन वर्षांपूर्वी बोंढार शिवारात एका कंटेनरमध्ये झोपलेल्या चालकाला शस्त्राचा धाक दाखवून 32 हजार रुपये लुबाडण्यात आले होते. या घटनेत चालकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला.
तीन वर्षांपूर्वी बोंढार शिवारात एका कंटेनरमध्ये झोपलेल्या चालकाला शस्त्राचा धाक दाखवून 32 हजार रुपये लुबाडण्यात आले होते. या घटनेत चालकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार होते. 12 मे रोजी पोलिसांना या घटनेतील फरार आरोपी शहरातील भगतसिंग चौकात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरुन त्याचा शोध घेतला असता, पोलिसांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी जेरबंद केले. सदर आरोपी तीन वर्षापासून फरार होता. बीदर, भालकी तसेच नांदेड शहरात तो लपून राहिला होता. या आरोपीस विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.