महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात विविध पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू - कृषी अधिकारी

नांदेड जिल्ह्यात विविध पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱयांना त्यांच्या अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी बंधनकारक आहे, तर बिगर कर्जदार शेतकऱयांसाठी ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱयांना पीकविमा उतरवण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०१९ ही देण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात विविध पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू

By

Published : Jun 3, 2019, 11:04 AM IST

Updated : Jun 3, 2019, 1:29 PM IST

नांदेड : प्रधानमंत्री पीकविमा योजनेतंर्गत जिल्ह्यात खरीप हंगामातील भात, ज्वारी, तीळ, मूग, उडीद, तूर, सोयाबीन आणि कापूस या ८ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना कर्जदार शेतकऱयांना त्यांच्या अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी बंधनकारक आहे, तर बिगर कर्जदार शेतकऱयांसाठी ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात विविध पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू


या योजनेतंर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येईल. तो खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के व कापसासाठी ५ टक्के ठेवण्यात आला आहे. सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तरसुद्धा निश्चित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट व काढणी पश्चात होणारी नुकसाने अश्या जोखीमांचे यामध्ये समावश करण्यात आले आहे.


कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱयांना पीकविमा उतरवण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०१९ ही देण्यात आली आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱयांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी व जवळच्या बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहेत.

Last Updated : Jun 3, 2019, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details