महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप व्हॅनचा अपघात; २३ वारकरी जखमी, ५ जणांची प्रकृती गंभीर - Accident

मुखेड शहराजवळ सावरगाववाडी येथे दुचाकीला वाचवताना झालेल्या अपघातात जीपमध्ये प्रवास करणारे २३ वारकरी जखमी झाले. यातील ५ जणांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

अपघातग्रस्त जीप

By

Published : Jul 14, 2019, 7:42 PM IST

नांदेड- उमरी तालुक्यातील महाटी व कोडगाव येथील वारकरी वारी संपवून आपल्या गावी परतत असताना त्यांच्या पिकअप जीपला रविवारी दुपारी तीन वाजता अपघात झाला. मुखेड जवळील सावरगाववाडी येथे एका दुचाकीस्वारास वाचविताना हा प्रकार घडला. यात २३ वारकरी जखमी झाले असून त्यातील ५ जण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

आळंदी ते पंढरपूर वारी करून शनिवारी द्वादशीचे पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर गाणगापूरचे दर्शन या वारकऱ्यांनी घेतले. यानंतर त्यांनी तुळजापूर येथे मुक्काम केला. रविवारी सकाळी ते तुळजापूर येथील तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परत आपल्या गावाकडे निघाले होते.

मुखेड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाववाडी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या (दुचाकी क्र. एमएच-२६-ए.एच. ३७६०) दुचाकीस्वारास वाचविताना पिकअप (जीप क्रमांक एमएच-३० एबी-३७५८) चालकाने तातडीने ब्रेक लावले. यामुळे जीप रस्त्यावरच उलटली आणि जीप चालकाने प्रयत्न करूनही दुचाकी या जीपवर आदळली. यात दुचाकीस्वारांना किरकोळ मार लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details