नांदेड - भूशास्त्र संकुलामधील संशोधक विद्यार्थ्यांची नुकतीच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पीएच डी आणि एम. फिल. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम मौखिक परीक्षा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.
स्वारातीम विद्यापीठामध्ये पीएचडीच्या मौखिक परीक्षा यापुढे होणार व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे - कुलगुरू डॉ. उद्धव भोसले नांदेड
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच डी आणि एम. फिल. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. जगासह भारतामध्ये सध्या 'कोविड १९' विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. लॉकडाऊन परिस्थितीमुळे संशोधक विद्यार्थ्यांना, मार्गदर्शकांना, विषय तज्ज्ञांना एकत्र येऊन पीएच. डी. अंतिम मौखिक परीक्षा घेणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनाने दूरदृष्य संवाद प्राणालीद्वारे संशोधक विद्यार्थी त्यांच्या संशोधनाचे सादरीकरण मार्गदर्शक, विषय तज्ज्ञ, संबंधित अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत परीक्षा घेण्यात येते. त्यानंतर पुढील कारवाई करून विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात येणार आहे.
विद्यापीठातील भूशास्त्र संकुलामध्ये दोन संशोधक विद्यार्थ्यांची नुकतीच अशाप्रकारे पीएच. डीची मौखीक परीक्षा पार पडली. सचिन घोडके आणि गौरव कोकंदकर यांनी ही परीक्षा दिली. विद्यापीठातील अधिष्ठाता यांच्या कार्यालयांमध्ये दूरदृष्य संवाद प्राणालीद्वारे ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वप्रथम पावरपॉइंटद्वारे त्यांच्या कामाचे सादरीकरण केले. यामध्ये 'विज्ञान व तंत्रज्ञान' विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, संशोधन केंद्राचे प्रमुख प्रो. के. विजयकुमार यांच्याद्वारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सदर परीक्षा घेण्यात आली.