नांदेड - जागतिक महामारी कोव्हिड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन 2020-21 या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर
अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेडमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्ज मागणीसाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा - nanded news update
बँकेमार्फत लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, 7/12, 8-अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज 2 फोटो, पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल.
ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी दि. 17 मे, 2020 ते 27 मे, 2020 या दरम्यान करावी. सदर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक, नांदेड मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. सदर यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे.
बँकेमार्फत लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, 7/12, 8-अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज 2 फोटो, पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. त्यानुषंगाने पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर पीक कर्ज मागणी नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
सदरील संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी कर्ज मागणीसाठी अर्ज करावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf