महाराष्ट्र

maharashtra

चांगली बातमी.. नांदेडात आज एकही नवा रुग्ण नाही, दहाजण कोरोनामुक्त

By

Published : Jun 21, 2020, 8:27 PM IST

सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण 35 अहवालापैकी सर्व अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात आज एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. तर, आज 10 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 304 इतकी आहे.

no new corona patient found in nanded
नांदेडात आज एकही नवा रुग्ण नाही

नांदेड- राज्यभरात झपाट्याने कोरोनाचा पसार होत असताना नांदेडकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण 35 अहवालापैकी सर्व अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यात आज एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. तर, आज 10 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील सहा तर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील चार रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 304 इतकी आहे. यातील 219 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 71 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

71 रुग्णांपैकी चौघांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्रिया आणि 52 व 54 वर्षांच्या दोन पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 71 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 46, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 5 बाधीत रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर, 6 रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवारी 79 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या -

सर्वेक्षण - 1 लाख 45 हजार 830

घेतलेले स्वॅब - 5 हजार 708

निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 985

एकुण पॉझिटिव्ह रुग्ण - 304

मृत्यू संख्या- 14

कोरोनामुक्तांची संख्या- 219

अॅक्टिव्ह रुग्ण - 71

ABOUT THE AUTHOR

...view details