नांदेड:.इंदुरीकर महाराज कीर्तन करताना आपल्या शैलीतून अनेकांचा समाचार घेतात. सध्या गौतमी पाटील हिने आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य भरात धुडगूस घातला आहे. इंदूरीकर महाराजांनी देखील एका कार्यक्रमात गौतमी पाटील हीचा समाचार घेत टीका केली होती. गैतामी पाटील हे एका गाण्यासाठी तीन लाख रुपय घेते असे वक्तव्य इंदूरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला होता. महिला संघटनांनी या वक्तव्याचा निषेध करत इंदुरीकर महाराज महिला विरोधी असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. या प्रकारानंतर इंदुरीकर महाराज यांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या कीर्तनातून बाहेर काही जाऊ नये म्हणून नांदेड येथील कार्यक्रमात त्यांनी मोबाईल आणि चित्रीकरण करणारे कॅमेरे हटविले. त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात केली.
इंदुरिकर यांचे आक्रमक रूप:स्वातंत्र सैनिक कै.भाऊराव पावडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी : ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकर हे नांदेडला आले होते. यावेळी त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झाली. कार्यक्रमाला तब्बल वीस हजाराच्या जवळपास नागरिक उपस्थित होते. आयोजक राजेश पावडे यांनी येणाऱ्या सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था केली होती. इंदुरीकर महाराज यांनी मीडिया प्रतिनिधींना कीर्तनापूर्वीच कॅमेरे बंद करण्यास लावले. मागील गौतमी पाटीलच्या प्रकारानंतर इंदुरीकर महाराज यांनी सावध भूमिका घेतली आहे. आपल्या कीर्तनातून बाहेर काही जाऊ नये म्हणून त्यांनी कॅमेरे आणि मोबाईल बंद करण्यास सांगितले. तसेच राजकारणावर व सध्याच्या परिस्थितीवर काही बोलतील या आशेने आलेल्या भाविकांना, मात्र कीर्तनकार प्रवचनकार इंदुरीकर यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले.