महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट; सोमवारी तीन रुग्ण वाढले तर, सोळा रुग्णांना डिस्चार्ज

आज नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी ३ रुग्ण आढळून आले असून १६ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १२० तर, उपचार घेणार्‍या रुग्णांची संख २१ इतकी राहिली आहे.

नांदेड कोरोना अपडेट
नांदेड कोरोना अपडेट

By

Published : Jun 1, 2020, 7:32 PM IST

नांदेड :एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर, दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे दिवसाकाठी कोरोनाच्या आजारातून बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाणही वाढत असून दिवसभराच्या काळात कोरोनामुळे उपचार घेत असलेल्या १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, ३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत प्राप्त ११६ अहवालांपैकी १०८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. सोमवारी सकाळी २४ स्वॅब अहवाल प्राप्त झाले असून ३ जणांचा अहवाल कोरेाना पॉझिटिव्ह आला आहेत. यामध्ये तिन्ही पुरुषांचा समावेश आहे. यातील दोन रुग्ण हे देगलूर नाका व एक रुग्ण शिवाजी नगर भागातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४९ इतकी झाली आहे.

सोमवारी पंजाब भवन कोव्हीड केअर सेंटर येथील ८, मुखेड - २, उमरी - ४, माहुर येथील १ व विवेक नगर भागातील मुंबई संदर्भित एक अशा १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १२० तर, उपचार घेणार्‍या रुग्णांची संख २१ इतकी राहिली आहे.

यापूर्वी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. यातील १ रुग्ण धोक्याबाहेर आला, असून ३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यात २ महिला ज्यांचे वय प्रत्येकी ५२, ६५ वर्ष असून व एक पुरुषाचा (वय ३८) समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

सोमवारी संध्याकाळ ५ पर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे -

• आत्तापर्यंत एकूण संशयित - ३९९०

• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या - ३७२४

• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - २०१४

• अजून निरीक्षणाखाली असलेले - १३८

• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - ५३

• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - ३६७१

• आज घेतलेले नमुने - १०५

• एकूण नमुने तपासणी - ३९९५

• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - १४९

• पैकी निगेटिव्ह - ३४८६

• नमुने तपासणी अहवाल बाकी - १७६

• नाकारण्यात आलेले नमुने - २८

• अनिर्णित अहवाल – १५२

• कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - १२०

• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – ८

• जिल्ह्यात बाहेरून आलेल्या एकूण १ लाख ४० हजार ३०७ प्रवाशांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details