महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युवकांच्या क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी छोटी क्रीडागंणे आवश्यक - अशोक चव्हाण - अशोक चव्हाण यांच्या हस्ते टेनिस कोर्टचे उद्घाटन

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लोकसहभागाला चालना देवून शहरातील रिकाम्या जागेवर छोटी-छोटी क्रीडांगणे, खेळाची मैदाने विकसित केली तर यातून युवा खेळाडूंना, त्यांच्या क्रिडा कौशल्याला, त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळेल, या दृष्टिकोनातून नांदेड शहरातील अडगळ ठरलेल्या जागेवर एक सुंदर टेनिस कोर्ट तयार करण्यात करण्यात आले आहे.

टेनिस कोर्ट
टेनिस कोर्ट

By

Published : Jun 7, 2021, 7:02 AM IST

नांदेड- शहराच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेत उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेवर छोटी-छोटी क्रीडांगणे, खेळाची मैदाने विकसित केली तर यातून युवा खेळाडूंना, त्यांच्या क्रीडा कौशल्याला, त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळेल. या दृष्टिकोनातून नांदेड शहरातील स्नेह नगर भागातील अडगळ ठरलेली जागा आज एका सुंदर टेनिस कोर्टमध्ये रुपांतरित झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लोकसहभागाला चालना देवून हे टेनिस कोर्ट साकरले आहे. या टेनिस कोर्टचे उद्घाटन करताना मला मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

'जिल्ह्यातून राष्ट्रीय पातळीवरील क्रिडापटू घडावेत'

यावेळी चव्हाण बोलताना म्हणाले की, "आपल्या जिल्ह्यातून राष्ट्रीय पातळीवरील क्रीडापटू घडावेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नांदेडसारख्या जिल्ह्यातील तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या धर्माबादपासून जवळपास सर्वच तालुक्यात अतिशय चांगले गुणवान युवा खेळाडू दडलेले आहेत. त्यांना पुढे आणण्यासाठी तालुका पातळीवर असलेल्या आपल्या विविध क्रीडा विभागाच्या सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या तर युवकांनाही क्रीडा क्षेत्रातील वेगळी संधी उपलब्ध करुन देता येईल", असा विश्वासही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. टेनिस कोर्टच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

टेनिस कोर्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

स्नेह नगर येथील शासकीय वसाहतीमध्ये अडगळीत पडलेल्या जागेवर साकारलेल्या टेनिस कोर्टचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सदस्य अमर राजूकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर मोहिनी येवणकर, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा -सोयाबीन उत्पादन वाढ : रुंद वरंबा व सरीचे तथा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details