महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात ४२ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रुग्णांची संख्या १२७ वर

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या १५५ अहवालांपैकी ९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह निघाले. तर ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८४ वर पोहोचली आहे. तसेच १२७ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील १६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

nanded covid 19
नांदेड जिल्ह्यात ४२ कोरोनाबाधितांची वाढ; सक्रिय रुग्णांची संख्या १२७ वर

By

Published : Jul 8, 2020, 2:00 PM IST

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी २ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ४२ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४८४ वर गेली आहे. १२७ जणांवर रुग्णालयात उपचार चालू असून आहेत. त्यापैकी ९ महिला व ७ पुरूष अशा १६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या १५५ अहवालांपैकी ९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह निघाले. तर ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४८४ वर पोहोचली आहे. मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झालेल्यांमध्ये चक्रधरनगरमधील १५, ४२ व ६८ वर्षीय पुरूष आणि १० व ४० वर्षीय महिला, गणेशनगरमधील ७० वर्षीय महिला, लक्ष्मीनगर देगलूरनाका मधील ५२ वर्षीय पुरूष, संभाजी चौक (सिडकोमधील) ६८ वर्षीय पुरूष, बळीरामपूरमधील ६० वर्षीय पुरुष, बी अँड सी कॉलनी (चैतन्यनगर) येथील ४४ वर्षीय पुरुष, नगर टेकडी (इतवारा बाजार) मधील ८३ वर्षीय पुरुष, पिरबु चव्हाण नगरमधील १८ वर्षीय पुरूष, नवीन हस्सापूरमधील ६ व ४७ वर्षीय पुरूष, २ व ५० वर्षीय महिला, उमर कॉलनीमधील ४, ३४ व ६१ वर्षीय पुरूष, बालाजीनगर (तरोडा बु.) मधील ५, २५, ३०, ५८ व ५ वर्षीय पुरूष, बालाजीनगर मधील ३४ व ५५ वर्षीय महिला, उत्तम निवास जिल्हाधिकारी कचेरीसमोरील ३६ वर्षीय पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

मंगळवारी पंजाबभवन कोविड केअर सेंटरमधील एक रुग्ण बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३५ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत १ लाक ४७ हजार ३७६ संशयितांची तपासणी करण्यात आली. ७, हजार ३०२ जणांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आले. त्यापैकी ६ हजार ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तसेच ४८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यापैकी २२ जणांच मृत्यू झाला आहे. १२७ जणांवर नांदेड, मुखेड, हदगाव, बिलोली, हिमायतनगर, मुदखेड, नांदेड शहरातील खासगी रुग्णालय तसेच औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांच्यापैकी १६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details