महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 370 नव्या रुग्णांची नोंद ; तर 2 हजार 827 रुग्ण सक्रिय

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात प्राप्त झालेल्या 1 हजार 625 अहवालापैकी 1 हजार 223 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 370 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड
नांदेड

By

Published : Sep 6, 2020, 1:24 PM IST

नांदेड - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 370 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर एका जणाचा मृत्यू झाला असून 242 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 2 हजार 827 कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू असून त्यापैकी 292 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात प्राप्त झालेल्या 1 हजार 625 अहवालापैकी 1 हजार 223 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 370 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने आढळले रुग्ण -

नांदेड मनपा क्षेत्रात 152, नांदेड ग्रामीण 19, अर्धापूर तालुक्यात 9, बिलोली तालुक्यात 8, भोकर तालुक्यात 4, लोहा तालुक्यात 5, नायगाव तालुक्यात 25, माहूर तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 10, देगलूर तालुक्यात 23, कंधार तालुक्यात 12, हिमायतनगर तालुक्यात 9, हदगाव तालुक्यात 8, उमरी तालुक्यात 30, यवतमाळ जिल्ह्यात 5, अहमदनगर जिल्ह्यात 1, बासरमध्ये 1, लातूर जिल्ह्यात 1

आजपर्यंत 54 हजार 642 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 43 हजार 812 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 8 हजार 582 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 5 हजार 445 कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 2 हजार 827 जणांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यापैकी 292 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 518 जणांचे नमुने प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details