महाराष्ट्र

maharashtra

नांदेड जिल्ह्यात बुधवारी 209 बाधितांची भर, सात जणांचा मृत्यू

By

Published : Oct 7, 2020, 9:13 PM IST

आजच्या एकूण 1 हजार 277 अहवालापैकी  1 हजार 28 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण  बाधितांची संख्या आता 16 हजार 841 एवढी झाली असून यातील  13  हजार 476 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 818 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 46 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

new 209 corona positive patient found and seven coronary died on wednesday in nanded district
नांदेड जिल्ह्यात बुधवारी 209 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू

नांदेड - बुधवार 7 ऑक्टोंबर 2020 ला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 263 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 209 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 68 तर अँटिजेन किट्स तपासणीद्वारे 141 बाधित आले. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या एकूण 1 हजार 277 अहवालापैकी 1 हजार 28 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 16 हजार 841 एवढी झाली असून यातील 13 हजार 476 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 818 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 46 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात सात जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात शनिवार 3 ऑक्टोंबरला माहूर तालुक्यातील वाई बा. येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा तर मंगळवार 6 ऑक्टोंबर अशोकनगर नांदेड येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा खासगी रुग्णालय नांदेड येथे, शारदानगर देगलूर येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा देगलूर कोविड रुग्णालयात, गजानन महाराज परिसर नांदेड येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, श्रीनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, बुधवार 7 ऑक्टोंबरला अर्धापूर येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर हदगाव तालुक्यातील वडगाव येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा हदगाव कोविड रुग्णालयात येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 446 झाली आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 12, बिलोली कोविड केंअर सेंटर 4, लोहा कोविड केंअर सेंटर 6, हदगाव कोविड केंअर सेंटर 6, माहूर कोविड केंअर सेंटर 1, मुखेड कोविड केंअर सेंटर 7, निजामाबाद येथे संदर्भीत 1, औरंगाबाद येथे संदर्भीत 2, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 13, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 161, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 6, किनवट कोविड केंअर सेंटर 13, नायगाव कोविड केंअर सेंटर 8, खासगी रुग्णालय 21, लातूर येथे संदर्भीत 2 असे 263 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.70 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 47, भोकर तालुक्यात 1, लोहा 3, हदगाव 1, धर्माबाद 2, कंधार 2, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 2, हिमायतनगर 1, किनवट 3, देगलूर 1, नायगाव 3, परभणी 1 असे एकुण 68 बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 64, लोहा तालुक्यात 8, हदगाव 1, माहूर 1, उमरी 7, अर्धापूर 5, मुखेड 20, नायगाव 4, नांदेड ग्रामीण 4, किनवट 12, धर्माबाद 1, कंधार 6, बिलोली 3, मुंबई 2, हिंगोली 3 असे एकूण 141 बाधित आढळले. जिल्ह्यात 2 हजार 818 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती


एकुण घेतलेले स्वॅब- 89 हजार 11,
निगेटिव्ह स्वॅब- 68 हजार 797,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 16 हजार 841,
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 13 हजार 476,
एकूण मृत्यू संख्या- 446,
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 82.70
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 18,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 773,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 818,
आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 46.

ABOUT THE AUTHOR

...view details