नांदेड : नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू ( Raining Continuously five days in Nanded ) आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत ( Rivers and Streams are Overflowing ) आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटलेला असताना वाहतूकही बंद ( Many Villages are Cut Off Communicatiion ) आहे. अशातच हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी राकडे याचे नियोजित लग्न ( Marriage of Shahaji Rakde )आज शुक्रवार उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली ( Marriage in Umarkhed taluk at Chincholi ) येथे आहे. तत्पूर्वी आजच्या टिळा, हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरदेव थर्माकॉलच्या होडीवरून सासुरवाडीत पोहचला ( Reached Sasurwadi in a Thermacol Boat ) असून, लग्नासाठी उतावीळ नाही. तर नियोजित विवाह वेळेत पूर्ण व्हावे हीच या मागची अपेक्षा असल्याचे बोलले जाते.
नवरदेवाची शिस्त : लग्नाच्या वेळी कार्यक्रमात बिभत्स नृत्य करून उशीर करणाऱ्या वर मुलांना सामान्य कुटुंबातील वराची ही चपराक आहे. करोडी ता. हदगाव येथील शहाजी माधव राकडे आठवी शिकलेला तरुण आहे. परिवारात आई-वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. बहिणींची लग्न झालीत. घरी शेती वगैरे काही नाही. मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालतो. त्याचा विवाह नात्यातीलच संगम चिंचोली ता. उमरखेड येथील वधू गायत्री बालाजी गोंडाडे या मुलीशी एक महिन्यापूर्वी जुळून आला होता.
पूरपरिस्थितीमुळे विवाहात अडचणी : ठरल्याप्रमाणे दि. १४ गुरुवारी सकाळी वधुकडे टिळा कुंकु पानवाट्याचा रात्री हळदीचा कार्यक्रम होता. सततच्या पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती असताना संगमचिंचोली हे पैनगंगानदी व कयाधू नदीचे संगमस्थान आहे. त्यामुळे येथे पूर परस्थिती विचारापलीकडची असते, असे असताना ठरल्याप्रमाणे नियोजीत वेळी टिळा, कुंकु पानवाट्याच्या कार्यक्रमात पोहचायचे कसे असा प्रश्न असताना वराकडील मंडळींना पडला होता.