महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#JantaCurfew गरज नसताना घराबाहेर पडलेल्या दोघांना लाठीचा प्रसाद - JantaCurfew nanded

शहरातील छत्रपती चौकात पोलीस गस्तीवर असताना हे तरुण दुचाकीवरून फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी दोघा तरुणांना लाठीचा प्रसाद देऊन त्यांना घरी जाण्यास भाग पाडले.

नांदेड
नांदेड

By

Published : Mar 22, 2020, 3:03 PM IST

Updated : Mar 22, 2020, 3:42 PM IST

नांदेड - कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले आहे. या जनता कर्फ्यूला नांदेड शहरातील जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गरज नसताना घराबाहेर पडलेल्या दोघांना नांदेडात लाठीचा प्रसाद खावा लागला.

दोन दुचाकीस्वार तरुणांनी जनता कर्फ्यूचे पालन न करता विनाकारण घराबाहेर पडल्याने त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. शहरातील छत्रपती चौकात पोलीस गस्तीवर असताना हे तरुण दुचाकीवरून फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी दोघा तरुणांना लाठीचा प्रसाद देऊन त्यांना घरी जाण्यास भाग पाडले. त्यामुळे गरज नसताना घराबाहेर पडण्याअगोदर किमान शंभरवेळा विचार करा अन्यथा पोलिसांकडून मिळणाऱ्या प्रसादाचे भागीदार आपणही होऊ शकता.

Last Updated : Mar 22, 2020, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details