नांदेड - 'देणाऱ्याचे हात हजार' या वाक्याला सार्थ ठरवले ते नांदेडचे प्रसिद्ध उद्योजक प्रदीप चाडावार यांच्या मदतीने, गरजू, बेघर, रेशनकार्ड नसणाऱ्या कुटुंबांना १ हजार अन्नधान्य मदतीच्या कीट पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.
पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास नांदेडकरांचा भरभरून प्रतिसाद.
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बेघर गरजू, गोरगरीब जनतेला मदत म्हणून दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो मिरची, मसाला पावडर अशा १ हजार किट जिल्हा प्रशासनास १००० व्यक्तीला वाटप करण्यासाठी व्यावसायिक प्रदीप चाडावार यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे मदतीच्या किट सुपूर्त केल्या.
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बेघर गरजू, गोरगरीब जनतेला मदत म्हणून दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मीठ, अर्धा किलो मिरची, मसाला पावडर अशा १ हजार किट जिल्हा प्रशासनास १००० व्यक्तीला वाटप करण्यासाठी व्यावसायिक प्रदीप चाडावार यांनी आज जिल्हा प्रशासनाकडे मदतीच्या किट सुपूर्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर उपस्थित होते.
प्रदीप चाडावर हे मूळचे किनवटचे असून नांदेड येथे वास्तव्यास आहेत. लायन्स क्लब नांदेडचे ते सदस्य असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे योगदान राहिले आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांनी एक हजार कीट जिल्हा प्रशासनास सुपूर्द केल्या. ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही अशा गरजुंना याचे वाटप करण्यात येणार आहे. देणाऱ्याचे हात हजार, तसे हजार व्यक्तीला ही मदत पोहोचणार म्हणून हे वाक्य आज सार्थ ठरले आहे.