नांदेड -जिल्ह्यातील लोहा शहर व तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. लोहा शहरापासून सात किलोमीटरवर असलेल्या धानोरा (मक्ता) येथे दोन दुचाकीस्वार नदीपात्रात वाहून गेले असून शोधपथकांना अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.
हेही वाचा... मराठवाड्यावरचं दुष्काळाचं संकट दूर होऊ दे, अशोक चव्हाणांचे विघ्नहर्त्याकडे साकडे
लोहा तालुक्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे शहराजवळ असलेल्या धानोरा (मक्ता) येथे रविवारी रात्री ओटा नदीला पूर आला होता. याचवेळी येथील जयराम काशीनाथ भुजबळ (४२) आणि बंडू एकनाथ बोंडारे (४३) हे दोघे दुचाकीवरून पूल ओलांडून जात असताना प्रवाहाच्या जोरामुळे दुचाकीसह वाहून गेले. रविवारी रात्री ही घटना गावात समजल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, रात्र असल्यामुळे त्यांचा शोध घेता आला नाही.