नांदेड - जिल्ह्यात आजवर एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. दोन वेगवेगळ्या राज्याच्या सीमा आणि राज्यातील पाच जिल्ह्याच्या सीमेवर नांदेड जिल्हा आहे. या सगळ्या सीमांवर पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे जिल्हा आजपर्यंत कोरोनामुक्त राहिलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यांचा बंदोबस्ताचा आळंदी पॅटर्न नांदेडमध्ये वापरला आहे.
पोलीस बंदोबस्ताच्या 'आळंदी पॅटर्न'मुळे नांदेड कोरोनामुक्त - पोलीस अधीक्षक मगर
दोन वेगवेगळ्या राज्याच्या सीमा आणि राज्यातील पाच जिल्ह्याच्या सीमेवर नांदेड जिल्हा आहे. या सगळ्या सीमांवर पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे जिल्हा आजपर्यंत कोरोनामुक्त राहिलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी बंदोबस्ताचा आळंदी पॅटर्न नांदेडमध्ये वापरला आहे.
सगळ्या सीमा, मुख्य रस्ते बॅरिकेट लावत बंद केल्यामुळे बाहेरून जिल्ह्यात कुणीही येऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे या काळात जिल्ह्यात जवळपास ७६ हजार प्रवाशी जिल्ह्यात आले. मात्र, त्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर आजवर ३२७ संशयितांचे नमुने तपासण्यात आले असून, त्यात एकालाही कोरोनाची लागण नाही.
पोलिसांच्या बंदोबस्तामुळेच कोरोनावाहक जिल्ह्यात येऊ शकला नाही. पोलिसांच्या बंदोबस्ताचा हा सापशिडीचा प्रयोग राज्यात इतरत्रही वापरण्यात आला आहे. दरम्यान, त्यामुळेच नांदेड सध्या तरी कोरोनामुक्त जिल्हा आहे. याचे श्रेय पोलिसांच्या आळंदी पॅटर्न बंदोबस्ताला जात आहे. आळंदी पॅटर्न संदर्भात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.