नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी घोषणा करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना तात्काळ पाच लाखांचा व त्यानंतर पुढील काळात 20 लाख असा एकूण 25 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा दक्षिण नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांनी दिले आहे. गावात एकोपा टिकून राहावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचे हंबर्डे यांनी सांगितले. गाव पातळीवरील निवडणुका घेणे खूपच अवघड ठरत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीमुळे गावातील एकोपा वादात रूपांतरित होऊ नये म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी पहिल्यांदाच बिनविरोध ग्रामपंचायत काढा आणि 25 लाख रुपयांचा निधी मिळवा, असे जाहीर केले आहे.
बिनविरोध निवड होताच पाच लाखाचे पत्र देणार
यात 4 जानेवारी रोजी नामांकन मागे घ्यायची शेवटची तारीख आहे.त्याच्या दुसऱ्याच दिवशी हंबर्डे हे तात्काळ त्या बिनविरोध गावासाठी पाच लाख रुपयांचे पत्र देणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षभरात 20 लाख रुपयांचा निधी असे 25 लक्ष रुपये बिनविरोध गावासाठी ते देणार आहेत. नांदेड दक्षिण मतदार संघातील गावांनी गाव विकासासाठी आता " बिनविरोध निवडणुका ही भूमिका स्वीकारावी व अंतर्गत विरोध गावाच्या हितासाठी बाजूला ठेवावा" असे, आवाहन हंबर्डे यांनी केले आहे.
पाच वर्षात बसवला जम
नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी थेट संवाद करत, थेट कार्यकर्त्यांची भेट व तात्काळ कामाचा निपटारा केल्यामुळे सव्वा वर्षाच्या काळात त्यांनी आपल्या मतदार संघात 'जम' बसवला आहे. नेहमी मतदारसंघात असलेले आमदार हंबर्डे यांचा लोहा शहर व तालुक्यात संपर्क वाढला आहे.
नांदेड दक्षिण मतदारसंघातील बिनविरोधसाठी पंचवीस लाखाच्या निधीची घोषणा....! - nanded grampanchayat election
ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी घोषणा करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींना तात्काळ पाच लाखांचा व त्यानंतर पुढील काळात 20 लाख असा एकूण 25 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा दक्षिण नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांनी दिले आहे. गावात एकोपा टिकून राहावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचे हंबर्डे यांनी सांगितले.
नांदेड ग्रामपंचायत निवडणुक