नांदेड- खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत आपल्या पहिल्याच भाषणाची सुरुवात गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाने केली. त्यांनी पीकविमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट, तालुका व जिल्हास्तरावर विमा कंपन्यांचे कार्यालय सुरू करणे, नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागण्या आपल्या भाषणादरम्यान केल्या.
पिकविम्यासाठी खा. हेमंत पाटील पाटलांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न....!
खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत आपल्या पहिल्याच भाषणाची सुरुवात गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाने केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा उल्लेखही आपल्या भाषणात केला.
सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. पण विमा कंपन्या यातून शेतकऱयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करत आहेत. ही बाब समोर आली आहे. याचा फायदा विमा कंपन्यांना होत आहे. पण महाराष्ट्रात या योजनेचा बट्याबोळ झाला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱयांची आर्थिक लूट होत असल्याची बाब त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या लक्षात आणून दिली.
विमा कंपन्यांचे जिल्हा व तालुका स्तरावर कार्यालय असावे. त्यामुळे शेतकऱयांना विम्याच्या रक्कमेसाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, या मागणीकडेही खा. पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शेतकऱयांच्या हितासाठी सुरू केलेला पीकविमा हा शेतकऱयांना त्वरित मिळावा, यासाठी नुकसानीचा पंचनामा २४ तासात करून ४८ तासात नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह अनेक मागण्या त्यांनी केल्या.