महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीच्या जागेबाबत २ दिवसात निर्णय घेऊ, चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आश्वासन - सांगली लोकसभा मतदारसंघ

महापालिकेचे विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने अशोक चव्हाण यांच्या घरी भेट घेतली. यावेळी सर्व नगरसेवकांनी मित्र पक्षावर अन्याय होणार नाही आणि सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी येत्या २ दिवसात सांगलीच्या जागेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती साखळकर यांनी दिली.

सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना खासदार अशोक चव्हाण

By

Published : Mar 28, 2019, 12:53 PM IST

Updated : Mar 28, 2019, 2:28 PM IST

नांदेड - सांगलीच्या जागेचा २ दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगली काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले आहे. सांगलीच्या तिढ्याबाबत बुधवारी सांगलीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी नांदेड येथे अशोक चव्हाण यांची भेट घेतली. तसेच सांगलीची जागा मित्र पक्ष स्वाभिमानीला न सोडता पक्षाकडून लढवली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्वासन देताना खासदार अशोक चव्हाण

महापालिकेचे विरोधीपक्ष नेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने अशोक चव्हाण यांच्या घरी भेट घेतली. यावेळी सर्व नगरसेवकांनी मित्र पक्षावर अन्याय होणार नाही आणि सांगलीची जागा काँग्रेसकडे राहिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. यावेळी अशोक चव्हाण यांनी येत्या २ दिवसात सांगलीच्या जागेचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती साखळकर यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आघाडी आहे. त्यावेळी आघाडी अबाधित राहावी यादृष्टीने सांगलीतील काँगेस नेत्यांनी निर्णय घ्यावा. प्रतीक पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र बसून मार्ग काढावा. सांगलीच्या जागेबाबत येथील काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन राजू शेट्टी चर्चा यांच्याशी चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

Last Updated : Mar 28, 2019, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details