नांदेड - आईनेच स्वतःच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून करून मृतदेह घाण पाण्यात फेकल्याची घटना ५ मार्चला उघडकीस आली आहे. ही माता वेडसर असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी मातेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवेश गहुबळे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
विक्षिप्त मातेने घोटला चिमुकल्याचा गळा; मृतदेह फेकला घाण पाण्यात - नांदेड क्राईम
नांदेडमधील मालटेकडी परिसरातील रेल्वे पुलाखाली एका बालकाचा मृतदेह असल्याची माहिती ५ मार्चला पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी मातेने स्वतःच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून करून मृतदेह घाण पाण्यात फेकल्याची घटना उघडकीस आली.
मालटेकडी परिसरातील रेल्वे पुलाखाली एका बालकाचा मृतदेह असल्याची माहिती ५ मार्चला पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी संबंधित घटना स्पष्ट झाली. मात्र, संबंधित बालक कोण आहे? याची चौकशी सुरू झाली. दरम्यान, याबाबत मृत चिमुकल्याचे वडील राहुल गहुबळे (रा. अंदेगाव ता. हिमायतनगर ह. मु. नांदेड) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
घटनेत मृताची माता कांचन गहुबळेने स्वतःचा मुलगा दिवेश (वय३) याचा ५ मार्चपूर्वी वेडाच्या भरात गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह रेल्वे पुलाखाली घाण पाण्यात फेकून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो निरीक्षक ननावरे करत आहेत.