नांदेड - भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे आईने दोन चिमुकल्यांची हत्या करून, आई व भावाच्या मदतीने पुरावा नष्ट केल्याची घटना घडली ( Mother Killed His two child in Nanded ) आहे. या प्रकरणी भोकर पोलिसात आज पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरावे नष्ट करण्यासाठी केले असे काही - धुरपताबाई गणपत निमलवाड (वय ३० रा.पांडूरणा) असे प्रमुख आरोपीचे नाव आहे. आरोपी महिला पांडुरणा येथे शेत शिवारात आखाड्यावर पती आणि दोन वर्षीय मुलगा आणि अवघ्या ४ महिन्याच्या मुलीसह रहात होती. तर सासु - सासरे दोघे अन्य दुसऱ्या शेतात वास्तव्यास होते. आरोपी धुरपताबाई निमलवाड हिने ३१ मे ते १ जून सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मुलगा दत्ता गणपत निमलवाड (वय. २ वर्षे) व मुलगी अनुसया गणपत निमलवाड (वय ४ महिने) या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली. त्यानंतर आरोपीने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राम्हणवाडा ता.मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला.