महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एफआरपीनुसार दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करा, नांदेडमध्ये मनसेचे ढोल बजावो आंदोलन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव न देणाऱया कारखान्यांच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

मनसेचे आंदोलन

By

Published : Mar 7, 2019, 4:51 PM IST

नांदेड - जिल्हा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत ४ जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरातील फरकाची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.


नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही शासनाचे नियम डावलून एफआरपीप्रमाणे भाव दिलेला नाही. नांदेड जिल्ह्यातील भाऊराव सहकारी साखर कारखान्याने १ हजार ७०० रुपये, कुंटूरकर शुगर्स २ हजार २०० रुपये, बान्हाळी येथील शिवाजी सर्व्हीस कारखान्याने १ हजार ८०० रुपये याप्रमाणे दर दिले आहेत.

ढोल बजावो आंदोलन
त्यामुळे दरातील फरकाची रक्कम तत्काळ देण्यात यावी. भाव कमी देणाऱ्या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी साखर सहसंचालक कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ढोल बजाओ आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार जयप्रकश बावसकर, जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, रवी राठोड, राज अवतानी, शफीक अब्दुल, उषाताई नरवाडे, राजू पाटील बरडे, गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड, शक्ती परमार, पप्पू मनसूके, महेश ठाकुर, गजानन यादव, शिवराज पाटील, गणेश पाटील, प्रवीण मंगनाळे, संतोष बनसोडे, शंकर पाटील, अनिल मुंडकर, शंकर महाजन, अमोल जाधव, गजानन वासमवार, रोहीत कटकमोड, पांडूरंग कोल्हेवाड, राणी वाघमारे , रंजना भवरे, प्रेमिला हनुमंते, उमा सूर्यवंशी, सागर मंडलपुरे, साहेबराव कोंडावार, व्यंकट वडजे आदींसह कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details