ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समीर वनखेडेवर कारवाई करून दाखवा; पुढचा कार्यक्रम आम्ही करू - नितेश राणे - sachin waze

मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. तुम्हाला वानखेडेवर राग आहे, तर सचिन वाझेवर इतके प्रेम का.? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का.?, असा प्रश्न विचारत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.

नितेश राणे
नितेश राणे
author img

By

Published : Oct 24, 2021, 3:31 PM IST

नांदेड- हिम्मत असेल तर समीर वानखेडेवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर या मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. नवाबाचे लाड का केले जात आहेत.? शिवसेनेचा मराठी बाणा कुठे गेला.?, असा सवाल करत नितेश राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.

बोलताना आमदार राणे

मग वानखेडे दाऊद इब्राहिम आहे का..?

भाजपाकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो ओसमा बीन लादेन आहे का.?, असा सवाल विधीमंडळात उपस्थित केला होता. आता आम्ही विचारतोय की वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहे..?, त्या नबावांचे इतके लाड का केले जात आहेत?, असे सवाल उपस्थित करून राणे यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला.

सचिन वाझेवर इतके प्रेम का.?

मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. तुम्हाला वानखेडेवर राग आहे, तर सचिन वाझेवर इतके प्रेम का.? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का.?, असा प्रश्न विचारत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.

देगलूर-बिलोली पोटनिवडणूक प्रचारात रंगत

देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान 30 अक्टोबर रोजी होणार आहे. तर 27 अक्टोबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाला काही दिवस बाकी असल्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामुळे यानिवडणूक प्रचाराला रंगत आली आहे.

हेही वाचा -संजय राऊत, नवाब मलिकांना शाहरुख खानने भाड्याने घेतले - नितेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details