नांदेड; मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा आमदाराच्या घराला घेराव - मराठा आरक्षण लेटेस्ट न्यूज
मराठा समाजाचे ओबीसीकरण, ओबिसींचे संरक्षण ही मोहीम संभाजी ब्रिगेडने हाती घेतली आहे. २१८५ मराठा तरूणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात, या मागण्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा आमदाराच्या घराला घेराव
नांदेड- मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिग्रेडच्यावतीने लोकप्रतिनिधीच्या घराला घेराव घाला आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यापासून करण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या अधिवेशनात मांडा, असा आग्रह संभाजी ब्रिग्रेडने आमदारांना केला आहे. येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर आमदारांनी आवाज उठवला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिग्रेडने दिला आहे.
Last Updated : Jul 3, 2021, 1:11 PM IST