महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाकाम करणाऱ्या केंद्र सरकारने महामार्गावरील खड्डेही बुजवावेत'

राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना विचारले असता, महामार्ग हे केंद्र सरकारच्या अख्यारीत येतो, असे म्हणत त्यांनी विषय मारत नेला.

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

By

Published : Oct 3, 2020, 8:45 PM IST

Updated : Oct 3, 2020, 9:25 PM IST

नांदेड- राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व रस्ते दुरुस्तीची ही जबाबदारी माझी नाही. मी राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असून ते महामर्ग रस्ते दुरुस्तीचे काम केंद्राचे असून त्यांनीच हे महाकाम करावे, असे म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ते जिल्ह्यातील अर्धापूर शहर व तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

बोलताना नांदेडचे पालकमंत्री
यावेळी चव्हाण म्हणाले, अर्धापूर शहरातील नगरपंचायतला कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. विकासकामे पारदर्शक व मजबूत करण्यासाठी सबंधितांनी प्रयत्न करावे, शहरात जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन विकास साधण्याचे काम सुरू आहे. अर्धापूर, दाभड मंडळात केळीचा विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विकासाला चालना देण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांनी केळीचा विमा मिळावा यासाठी निवेदन दिले तर शहरांमधील विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.

अर्धापूर शहरातील नगरपंचायत पाणी पुरवठा योजना, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, वाचनालय, सिमेंट नाली-रस्ते यासह विविध विकासकामांची शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) पाहणी करुन, कामाचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना मुदतीत मजबूत व पारदर्शक कामे करण्याचे आदेश या बैठकीत दिल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

केंद्र व राज्याच्या वादात खड्डे जैसे थे

मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रसरकारकडे बोट दाखवून संबंधित विभागाला सूचित करू, असे म्हटले असले तरी चाचले असते. महामार्गवारील खड्ड्यामुळे अनेक अपघात आणि मृत्यू होत आहेत. केंद्र आणि राज्याच्या जबाबदारी नाट्याच्या राजकारणात खड्डे मात्र जैसे थेच आहेत. निष्पाप बळी जात आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी नसली तरी जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या पालकमंत्र्याने जबाबदारी झटकल्यामुळे नेमकी दाद कुणाकडे मागावी ? अशी कुजबुजही ऐकायला मिळाली.

हेही वाचा -नांदेड : अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा; शेतकरी कायद्यावरून केंद्राचा निषेध

Last Updated : Oct 3, 2020, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details