महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षण संपवण्याचा अजेंडा - पालकमंत्री अशोक चव्हाण - Congress agitation in nanded

नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मोदी सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

धरणे आंदोलन
धरणे आंदोलन

By

Published : Jun 26, 2021, 8:05 PM IST

नांदेड - नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मोदी सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षण संपवण्याचा अजेंडा

'आरक्षण संपविण्याचे षडयंत्र'

मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो नोकरीतील मागासवर्गीय अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय असो किंवा मुस्लिम आरक्षणाचा विषय असो, हे सर्व विषय केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे अडचणीत आले आहेत. ओबीसी समाजाच्या जनगणनेचा डाटा मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिला नाही म्हणून ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. एकूणच भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशातील आरक्षण संपविणे हा अजेंडा असून या अजेंडाची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहेत, असा घणाघाती आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केला.

धरणे आंदोलन

अनेक मान्यवरांची उपस्थिती -

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सर्वप्रथम पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिणी येवनकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभापती संजय बेळगे, सभापती बाळासाहेब रावणगावकर, मनपा सभापती संगीता पाटील डक, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, माजी महापौर अब्दुल सत्तार, सुभाष रायबोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी विधानपरिषद प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर व माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणावर कडाडून हल्ला केला. महापौर मोहिणी येवनकर यांनी सर्वांना समानतेची शपथ दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details