महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' विधानाचा विपर्यास केला; मंत्री अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण - मंत्री अशोक चव्हाण ऑन शिवसेना महाविकास आघाडी

सीएए व एनआरसी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लीम समाजातील महिला-पुरुष, मुला-बाळांसोबत धरणे आंदोलनासाठी बसलेले होते. या आंदोलनास चव्हाण यांनी भेट दिली.

minister ashok chavan
मंत्री अशोक चव्हाण

By

Published : Jan 22, 2020, 3:12 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:27 PM IST

नांदेड- आम्ही सेनेसोबत महाआघाडीत सामील झालो नसतो. परंतु, मुस्लिमांच्या आग्रहाखातर व भाजपला रोखण्यासाठी सत्तेत सामील झालो. परंतु, या माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे, असे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

मंत्री अशोक चव्हाण

सीएए व एनआरसी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लीम समाजातील महिला-पुरुष, मुला-बाळांसोबत धरणे आंदोलनासाठी बसलेले होते. या आंदोलनास चव्हाण यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा -सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीसाठी कायदा - सुभाष देसाई

सीएए अथवा एनआरसी विरोधाविषयी फक्त मुस्लीम समाजच आग्रही नसून सर्व समाज व संविधानास आणि लोकशाहीस मानणारे सगळे लोक आग्रही आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे मी बोललेल्या विधानाचा विपर्यास केला, असे सांगून त्यांनी या विषयी स्पष्टीकरण दिले.

Last Updated : Jan 22, 2020, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details