लातूर - राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात येत असले तरी कोरोना आटोक्यात येत नाही. मागील एका वर्षाहून अधिक काळ विविध निर्बंधांसह लॉकडाऊन लागू आहे. आता राज्य शासनानेही 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र व्यापारी, छोटे दुकानदार यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्हा प्रशासनाने नियम शिथिल करून व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा उद्यापासून (शनिवार) कोरोनाचे नियम पाळून स्वत: दुकाने उघडू, अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतली आहे. यासंदर्भात लातूर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन दिले आहे.
उद्यापासून व्यापारी दुकाने उघडणार; व्यापारी महासंघाची भूमिका - latur covid situation
कोरोना महामारीच्या मागील एका वर्षाच्या काळात व्यापारी, उद्योजक, लघु व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य केले. मागील अनेक महिन्यांपासून व्यवसाय, दुकाने बंद असल्याने व्यापारी व उद्योजक वर्गाचा आर्थिक कणा मोडला आहे. जिल्हा प्रशासनाने नियम शिथिल करून व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा उद्यापासून (शनिवार) कोरोनाचे नियम पाळून स्वत: दुकाने उघडू, अशी भूमिका व्यापारी महासंघाने घेतली आहे.
कोरोना महामारीच्या मागील एका वर्षाच्या काळात व्यापारी, उद्योजक, लघु व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य केले. मागील अनेक महिन्यांपासून व्यवसाय, दुकाने बंद असल्याने व्यापारी व उद्योजक वर्गाचा आर्थिक कणा मोडला आहे. परिणामी अनेक व्यापाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. दुकानं भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, लाईट बिल, घर खर्च, औषधोपचारांचा खर्च वाढल्याने आर्थिक आणि मानसिक संतुलनही बिघडले आहे. अनेक व्यापारी परिवारात दुःखद घटना देखील घडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापारी, उद्योजकांचा जगण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना उद्या 15 मेपासून कोरोनाचे, सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करून व्यवसाय सुरु करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तर नियमांचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. शिष्टमंडळात प्रदीप सोलंकी, मनिष बंडेवार, विश्वनाथ किणीकर, विनोद गिल्डा, रामदास भोसले, आतिष अग्रवाल, भारत माळवदकर, राघवेंद्र इटकर, दत्तात्रेय पत्रावळे, मुस्तफा शेख, चंदू बलदवा, गोविंद चेटवानी, कमलेश पाटणकर यांचा समावेश होता.