नांदेड - माहेरहून १० लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुजा अमोल सुळे असे पीडित विवाहितेचे नाव आहे.
दहा लाखांची मागणी करत विवाहितेला उपाशी ठेवून मारहाण; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा - विवाहितेचा छळ
दवाखाना टाकणे आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे सासरच्या लोकांनी तगादा लावला होता.
नांदेड
दवाखाना टाकणे आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे सासरच्या लोकांनी तगादा लावला होता. यासाठी तिचा ५ नोव्हेंबर २०१७ पासून आत्तापर्यंत सासरी मुंबईत छळ केला जात होता. अश्लील शिवीगाळ करणे, मारहाण करणे या शिवाय उपाशी ठेऊन तिचा छळ केला जात होता. याप्रकरणी तक्रारीवरून वरभाग्यनगर पोलिसांनी पती अमोल, सासू पुष्पा, दीर नितीन व जाऊ श्रद्धा यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.