नांदेड - माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गर्भपात केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतापजनक..! ५ लाखांसाठी विवाहितेचा गर्भपात, सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल - abortion
माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गर्भपात केल्याची घटना घडली.
माहेराहून स्कॉर्पिओ गाडी व मोबाईल दुकानासाठी माहेरवरुन ५ लाख रुपये घेऊन असे म्हणत तबस्सुम बेगम शेख सोहेल यांना सासरच्या मंडळींनी मारहाण केली आहे. यामध्ये तबस्सुम बेगम यांचा गर्भपात झाला आहे. शहरातील गोकुळनगरमध्ये ही घटना घडली. मारहाण करणाऱ्यांमध्ये पती शेख सोहेल, रजिया बेगम शेख इस्माइल (सिडको), अंजुम बेगम अमजद खान (बोधन), शबाना रियाज (मुंबई) यांचा समावेश आहे. या सर्वांनी तबस्सुम बेगमच्या पोटावर, लाथा बुक्याने व पायाने मारहाण केली. यामध्ये त्यांचा गर्भपात झाला.
या प्रकरणी तबस्सुम यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 262/2019 कलम 498,(अ) 315, 323,504,34 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिणी नपते करीत आहेत.