नांदेड - लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी ऐतिहासिक विजय घडविला होता. लोहा-कंधार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्या होमपीचवरच त्यांना धक्का बसला आहे. शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे यांना पक्षाने बी-फार्म देऊन शिवसेनेने आपला हक्क कायम ठेवला आहे. खा.चिखलीकरांच्या हक्काच्या मतदारसंघातच वांदे होऊन बसल्यामुळे स्वतःच्या घरचीच वाट बिकट होऊन बसली आहे.
हेही वाचा -सातारा लोकसभेचा आखाडा रंगणार.. उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील
गत निवडणुकीत लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर प्रताप पाटील-चिखलीकर हे भाजपच्या मुक्तेश्वर धोंडगे यांचा पराभव करून मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यानंतर त्यांचे शिवसेनेसोबत बिनसल्यामुळे त्यांनी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. नांदेड लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर भाजपने उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी टाकली. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करून त्यांनी ऐतिहासिक विजय प्राप्त करत यशस्वीही झाले. त्यानंतर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला. कोणत्याही परिस्थितीत लोहा-कंधार मतदारसंघ हा आता भाजपच्या वाट्याला येईल, असा विश्वास होता. मात्र, हा आत्मविश्वास त्यांना नडला.